कोल्हापूर : छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने संस्थापक चेअरमन राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या दूरदर्शी नेतृत्त्वाखाली व कुशल मार्गदर्शनाखाली सभासद शेतकऱ्यांसाठी अनेक ऊस विकास योजना सुरू केल्या. या योजनांचा सभासदांना चांगला लाभ होत आहे. ऊस उत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत होत आहे. सभासदांचे हित जपत प्रगतशील शेतीसाठी प्रयत्न करणारा ‘छत्रपती शाहू’ हा एकमेव कारखाना असावा, असे प्रतिपादन कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे यांनी केले.
अध्यक्षा घाटगे यांच्या हस्ते कारखान्यातर्फे राबविण्यात येत असलेल्या ऊस विकास योजनेंतर्गत विविध योजनेतील लाभार्थी सभासदांना अनुदानाचे धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमात श्रीमंत विजयादेवी घाटगे महिला ठिबक योजनेचे ८७ हजार ४०० रुपये, जनरल ठिबक सिंचन योजनेचे २ लाख ७५ हजार २२५ रुपये, मोटर पाईपलाईन योजनेचे ३ हजार रुपये आणि शेती औजारांसाठीचे ५५ हजार रुपये देण्यात आले. यावेळी कारखान्याचे संचालक युवराज पाटील, सचिन मगदूम, सतीश पाटील, सुनील मगदुम, कार्यकारी संचालक जीतेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. शेती अधिकारी रमेश गंगाई यांनी स्वागत केले. ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव यांनी आभार मानले.