विश्वास कारखान्यातर्फे शेतकऱ्यांना ऊस रोपांचे वाटप : संचालक विराज नाईक

शिराळा : महाराष्ट्रात ऊस बियाण्यांचा बदल हा ६ टक्के होतो. खरेतर ऊस उत्पादन वाढवायचे असेल तर बियाणे बदलाचा दर ३३ टक्क्यापर्यंत वाढवणे गरजेचे आहे. त्यातही उती संवर्धित रोपापासून बियाणे बदलाचा दर हा अधिक जलदरीत्या गाठता येऊ शकतो. या रोपांमुळे शुद्ध बियाणे मिळते. ऊस उत्पादनामध्ये ते २५ टक्के वाढ होऊन साखर उताऱ्यात वाढ होते. हे लक्षात घेऊनच कारखान्यातर्फे ऊस रोपांचे वाटप सुरू आहे, असे प्रतिपादन चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी कारखान्याचे संचालक विराज नाईक यांनी केले.

विश्वासराव नाईक सहकारी कारखान्यामार्फत शेतकऱ्यांकरिता उती संवर्धित ऊस रोपांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी संचालक नाईक म्हणाले की, शेतकऱ्यांना शुद्ध निरोगी बियाणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कारखान्याने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमार्फत उती संवर्धित ऊस रोपांचे वाटप केले आहे. यावेळी मुख्य शेती अधिकारी ए. ए. पाटील प्रमुख उपस्थित होते. उप ऊस विकास अधिकारी संदीप पाटील यांनी स्वागत केले. यावेळी विजय जाधव, बाजीराव पाटील, दीपक सपाटे, जगन्नाथ चव्हाण, युवराज पाटील व दिलीप पाटील, अर्जुन पाटील आदी शेतकऱ्यांना रोपे देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here