मुंडेरवा : उत्तर प्रदेशातील साखर कारखाने जादा ऊस उत्पादनाकडे लक्ष देत आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना नवीन प्रजातीचे बियाणे आणि शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करुन दिले जात आहे. मुंडेरवा कारखान्याने गुरुवारी शेतकऱ्यांना बियाण्यांचे वितरण केले. कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक अभिषेक पाठक यांनी सांगितले की, जर शेतकऱ्यांनी १० क्विंटल ऊस बियाणे खरेदी केले तर त्यांना पाच क्विंटलचेच पैसे द्यावे लागतील.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कारखान्याच्यावतीने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्य ऊस व्यवस्थापक कुलदिप द्विवेदी यांनी सांगतिले की, कारखान्याकडे बियाण्याची कमतरता नाही. पुरेसे बियाणे उपलब्ध आहे. यावेळी डॉ. व्ही. के. द्विवेदी, इंद्रेश यादव, सुदामा यादव, दिनेश यादव, सुरेश यादव, सुग्रीव यादव, सभापती राम अचल, संदीप कुमार आदी उपस्थित होते