ऊस खोडकिड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना ट्रायकोकार्डचे वाटप

अहिल्यानगर : भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या प्रवरानगर येथील भारतीय ऊस संशोधन संस्थेच्या जैविक नियंत्रण केंद्र व लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने जैविक पद्धतीने ऊस खोड किड नियंत्रणासाठी ३० ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्वावर ट्रायकोकार्ड वितरण करण्यात आले. नेवासा तालुक्यातील भेंडा येथे झालेल्या कार्यक्रमात कारखान्याचे उपाध्यक्ष, माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. श्यामसुंदर कौशिक यांनी सांगितले की, ऊस खोडकिड नियंत्रण ही मोठी ज्वलंत समस्या आहे. ९८ टक्के किड नैसर्गिकरित्या नियंत्रित होते. मात्र उर्वरित २ टक्के किड नियंत्रणासाठी जैविक किंवा रासायनिक वापर करावा लागतो. मात्र, अनेकवेळा ते हानिकारक ठरते. भारतीय ऊस संशोधन केंद्र लखनऊ यांच्या मार्फत जैविक खोड किड नियंत्रण केले जात आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. पिकाला पाणी दिल्यानंतर ट्रायकोग्रामा सकाळी किंवा संध्याकाळी शेतात सोडावे. ट्रायकोग्रामा शेतात सोडण्यापूर्वी किंवा नंतर हानिकारक कीटकनाशके फवारू नये. यावेळी कारखान्याचे संचालक काकासाहेब शिंदे, अशोक मिसाळ, शिवाजी कोलते, मच्छिंद्र म्हस्के, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, कामगार संचालक सुखदेव फुलारी, केव्हिके प्रमुख डॉ. श्यामसुंदर कौशिक, ऊस विकास अधिकारी मंगेश नवले, कामगार अधिकारी बाळासाहेब डोहाळे, डॉ. भास्कर ताकटे, आप्पासाहेब देशमुख, गणेश नवले, शरद मिसाळ, सर्जेराव कचरे, सखाराम नवले आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here