‘दत्त इंडिया ‘ला जिल्हा बँकेची नोटीस, करार मोडून कारखाना ताब्यात घेण्याचा इशारा

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कर्जापोटी जिल्हा बँकेकडे गेल्या तीन वर्षांत दत्त इंडिया कंपनीने एक रुपयाही भरलेला नाहीत. त्यामुळे या कारखान्याचे व्याजासह ५३ कोटी रुपये थकीत आहेत. मार्चपूर्वी ही थकबाकी भरावी, अन्यथा कारखाना चालवण्यास देण्यासाठी जिल्हा बँक, वसंतदादा कारखाना व दत्त इंडिया कंपनीत झालेला त्रिपक्षीय करार मोडून कारखाना ताब्यात घेण्याचा इशारा जिल्हा बँकेने दिला आहे. कारखाना व कंपनीला नोटीस बजावण्यात आल्याचे समजते.

‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीत म्हटले आहे कि, वसंतदादा साखर कारखान्याकडील थकीत कर्जाच्या वसुलीसाठी जिल्हा बँकेने या कारखान्याची स्थावर व जंगम मालमत्ता सिक्युरिटायेझशन ॲक्ट अंतर्गत ताब्यात घेतली आहे. वसंतदादा चालवण्यासाठी जिल्हा बँकेने निविदा मागवल्या होत्या. यात दत्त इंडिया कपंनीने प्रति टन सर्वाधिक दर भरल्याने  या कंपनीला दहा वर्षांच्या मुदतीने वसंतदादा कारखाना चालवण्यास दिला.

कारखान्याकडील कर्जाचे हसे करून दरवर्षी सदरचे कर्ज कंपनीने भरावे, कर्मचारी, व्यापारी तसेच सर्व प्रकारची शासकीय देणी कंपनीने भागवावीत यासह विविध अटी शर्ती असलेला त्रिपक्षीय करार जिल्हा बँक, वसंतदादा  कारखाना व दत्त इंडिया कंपनी यांच्यात करण्यात आला. त्यानुसार गेली आठ वर्ष वसंतदादा कारखाना दत्त इंडिया कंपनी चालवत आहे.

दत्त इंडियाने आत्तापर्यंत वसंतदादा कारखान्याचे जिल्हा बँकेकडील थकीत कर्ज ५० टक्क्यापेक्षा जास्त भरले आहे. मात्र तीन वर्षांपासून या कर्जापोटी कंपनीने एकही रुपया बँकेकडे भरलेला नाही. जिल्हा बँकेने कंपनी व कारखान्यास वारंवार याबाबत कळवूनही थकीत कर्ज न भरल्याने अखेर बँकेने कड़क भूमिका घेत वसंतदादा कारखाना व दत्त इडिया कंपनीला नोटीस बजावली आहे.

मुद्दल सुमारे ४० कोटी व व्याजाचे १३ कोटी असे ५३ कोटी रुपये थकीत आहेत. मार्चअखेर न भरल्यास कारखाना, दत इंडिया कंपनीशी केलेला जिल्हा बँकेचा करार मोडून कारखाना ताब्यात घेण्याचा इशारा बँकेने दिला आहे. याबाबत श्री दत्त इंडियाचे उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे म्हणाले कि, दत्त इंडिया कंपनीने नियमाप्रमाणे भाडे दिले आहे. याबाबत कोणातीही नोटीस आम्हाला मिळालेली नाही.

साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here