“साखर कारखान्यांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी करताहेत टाळाटाळ” 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

कोल्हापूर , ता. 7 : ऊस उत्पादकांना ‘एफआरपी’ न देणा-या साखर कारखान्यांच्या विरोधात साखर आयुक्तांनी महसुली वसुली प्रमाणपत्रे (आरआरसी) नोटिसा बजावल्या; परंतु जिल्हा प्रशासनाकडून त्या आदेशाच्या अंमलबजावणीस टाळाटाळ केली जात आहे. या संदर्भात जिल्हाधिका-यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. तसेच, जिल्हा स्तरावर आंदोलनही करण्यात येणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी  संघटनेचे  नेते खासदार राजू

शेट्टी यांनी आज येथे दिला.
राज्यातील साखर कारखान्यांनी ‘एफआरपी’पोटी शेतक-यांचे तीन हजार ५९५ कोटी रुपये थकविले आहेत. याबाबत संघटनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेतली. साखर आयुक्तालयाकडून या हंगामात ६२ कारखान्यांना ‘आरआरसी’ नोटिसा बजावण्यात आल्या. या ‘आरआरसी’च्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिका-यांची आहे; परंतु राजकीय दबावापोटी दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरून जिल्हाधिका-यांना जाब विचारणार आहोत. तसेच, त्यांना उच्च न्यायालयात खेचण्यात येईल, असे खासदार शेट्टी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here