पोंगल हॅम्परसाठी सर्व आकारातील ऊस खरेदीचा सरकारकडे आग्रह

चेन्नई : अण्णाद्रमुकच्या माजी अंतरिम महासचिव आणि दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निकटवर्ती व्ही. के. शशिकला यांनी तामीळनाडू सरकारला पोंगल गिफ्ट हॅम्परसाठी सर्व आकारातील ऊस खरेदी करण्याचे आवाहन केले आहे.
त्या म्हणाल्या की, राज्य सरकारने पोंगल गिफ्ट हॅम्परसाठी खरेदी केल्या जाणाऱ्या ऊसाची लांबी ६ फूट ठेवली आहे. मात्र, ही लांबी शक्य नाही. शशिकला यांनी सांगितले की, ऊसाचा आकार जेथे त्याचे पिक घेतले गेले आहे, तेथील मातीवर अवलंबून असतो. आणि त्याचा आकार काय असावा हे शेतकऱ्यांच्या हाती नाही. अण्णाद्रमुकच्या माजी महासचिव शशिकला यांनी म्हटले आहे की, सरकारने ऊसाच्या निश्चित अशा आकारावर अडून राहू नये. आणि शेतकऱ्यांकडील सर्व आकारातील ऊस खरेदी केला पाहिजे. सद्यस्थितीत राज्य सरकार शेतकऱ्यांकडून ३३ रुपये प्रती नग दराने ऊसाची खरेदी करीत आहे. हा ऊस पोंगल गिफ्ट हॅम्पमध्ये देण्यात येणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here