ज्ञानेश्वर साखर कारखान्याला उत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी पुरस्कार

अहमदनगर : भारतीय शुगर या देश पातळीवर मान्यताप्राप्त संशोधन संस्थेचा बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स को-ऑपरेटिव्ह शुगर मिल अवॉर्ड भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे. कारखान्याने सर्वांगिण क्षेत्रात केलेले कार्य, साखर उद्योगातील अमूल्य योगदान आणि साखर उद्योगाला आघाडीवर आणण्याचा प्रयत्न याबद्दल हा बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स को-ऑपरेटिव्ह शुगर मिल अवॉर्ड देण्यात येत आहे.

भारतीय शुगर (कोल्हापूर) ही मान्यता प्राप्त संशोधन संस्था असून १९७५ पासून सहकारी आणि खाजगी साखर क्षेत्रासाठी काम करते. दरवर्षी साखर उद्योगात कार्यरत असणारे साखर कारखाने, अधिकारी व पदाधिकारी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. १० फेब्रुवारी २०२४ रोजी कोल्हापूर येथे विशेष कार्यक्रमात लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here