स्थानिक बाजारात साखरेची किंमत वाढवायला हवी : वर्मा

नवी दिल्ली : चीनी मंडी

आंतरराष्ट्रीय बाजारात जर, साखरेचे दर चांगले नसतील, तर भारतातील साखर कारखान्यांना साखर निर्यात करणे अशक्य होईल, असे मत इंडियन शुगर मिल असोसिएशनचे संचालक अविनाश वर्मा यांनी व्यक्त केले आहे. स्थानिक बाजारपेठेतही साखरेचे दर तीन रुपयांना वाढवायला हवेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

वर्मा म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय बाजारात मे महिन्यापासून साखरेचे दर घसरायला सुरुवात झाली आहे. प्रति टन सुमारे ५० डॉलरने हा भाव घसरला आहे. मे महिन्यापूर्वी प्रतिटन ३५० डॉलरचा भाव आता ३०० डॉलरच्या आसपास आहे. त्यामुळे प्रति किलो ३ ते साडे तीन रुपयांचे नुकसान होत आहे. स्थानिक बाजारात गेल्या वर्षी साखरेची किंमत प्रति किलो ४४-४५ रुपयांच्या आसपास होती. तुलनेत यावर्षी हा दर ९ ते दहा रुपयांनी घसरला आहे. हे पाहता साखरेची किमान विक्री किंमत ३ ते चार रुपयांनी वाढविली, तर ते साखर उद्योगासाठी चांगले ठरले. ग्राहक सध्या ३४-३५ रुपयांना साखर खरेदी करत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ते स्वस्तच आहे. जर किंमत वाढली, तरी ग्राहकावर मोठा ताण पडणार नाही. जर ३-४ रुपयांनी किंमत वाढवली तर सरकारच्या सबसिडीशिवाय हे साखर कारखाने निर्यात करू शकतील. कारण, जर त्यात नुकसान झालेच तर स्थानिक बाजारात साखर विकून कारखाने भरपाई करू शकतात. ’

स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही बाजारपेठांमध्ये दर घसरत असल्यामुळे साखर उद्योगाला मोठा फटका बसत आहे. साखर उद्योगासाठी २० लाख टन निर्यात कोटा जाहीर करण्यात आला होता. मात्र आतापर्यंत केवळ ५ लाख टन साखरेचीच निर्यात झाली आहे. त्यामुळे सरकारने निर्यायीची मुदत तीन महिन्यांपासून वाढवून डिसेंबरपर्यंत वाढविली आहे. पण, जर, २०१८-१९च्या हंगामातही आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या साखरेचे दर घसरले, तर मात्र, साखर उद्योगापुढे मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here