भारताने सहा दिवसांनतर दैनंदिन रुग्णसंख्येचा आकडा 40,000 पेक्षा कमी नोंदवला. गेल्या 24 तासांतील नवीन रुग्णसंख्या ही 38,073 एवढी नोंदवली गेली. सलग तिसऱ्या दिवशी दैनंदिन नव्या केसेस 50,000 हून कमी आहेत.
गेल्या तीन चार दिवसांमध्ये काही देशांमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहेत म्हणजे दैनंदिन 1 लाख एवढे जास्त; या पार्श्वभूमीवर हे विशेष उल्लेखनीय आहे.
गेल्या काही आठवड्यात सक्रीय रुग्ण संख्येत सातत्याने घट होत आहे. आज 38व्या दिवशी, बरे होणाऱ्यांची संख्या नव्या रुग्णसंख्येहूनी वाढली आहे. गेल्या 24 तासात 42,033 जण बरे झाले.
(Source: PIB)