डॉ. शंकरराव चव्हाण कारखान्याचा २१ सप्टेंबर रोजी प्रथम बॉयलर अग्नि प्रदीपन सोहळा

नांदेड : उमरी तालुक्यातील वाघलवाडा – कुसुमनगर येथील डॉ. शंकरराव चव्हाण जॉगरी अँड अॅग्रो प्रॉडक्ट लिमिटेडचा गळीत हंगाम  २०२३-२४ चा प्रथम बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ दि.२१ सप्टेंबर २०२३ रोजी (गुरुवारी) दुपारी १२.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमासाठी श्री दत्त संस्थान मठ कोलंबी येथील महंत मधुबन महाराज, मोहनापुर येथील श्री दत्त संस्थान मठाचे श्रीरामभारती महाराज, चोळाखा येथील श्री दत्त संस्थान मठाचे गुरुदत्त पुरी महाराज, बिजेगाव येथील श्री दत्त महानुभाव  मठाचे आचार्य श्री बामेराज बाबा कपाटे, श्री दत्त संस्थान मठ माहूर येथील श्री साईनाथ महाराज – बितनाळकर यांच्या आशीर्वादाने व बरबडा येथील प्रगतशील शेतकरी श्रीनिवास धर्माधिकारी व त्यांच्या सुविद्य पत्नी तसेच व्हीपीके उद्योग समूहाचे चेअरमन मारोतराव कवळे – गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ होणार आहे.  या कार्यक्रमासाठी परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. शंकरराव चव्हाण जॉगरी अँड अॅग्रो प्रॉडक्ट लिमिटेडच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here