डॉ. राहुल कदम यांना ‘युथ आयकॉन ऑफ द शुगर इंडस्ट्री’ पुरस्कार

कोल्हापूर : भारतीय शुगर या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेचा युथ आयकॉन ऑफ शुगर इंडस्ट्रीज हा पुरस्कार उदगिरी शुगर्सचे चेअरमन डॉ. राहुलदादा कदम यांना नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट, कानपुरचे संचालक नरेंद्र मोहन यांच्या हस्ते समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आला. या प्रसंगी भारतीय शुगरचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे, CEO संग्रामसिंह शिंदे, उदगिरीचे संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम उपस्थित होते.

कोल्हापूर येथील हॉटेल सयाजी येथे झालेल्या या शानदार समारंभाला साखर उद्योग क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. डॉ. राहुल कदम यांनी उदगिरी शुगर्सची धुरा खांद्यावर घेऊन, साखर उद्योग क्षेत्रात दरवर्षी नवे विक्रम प्रस्थापित करण्याचा धडाका लावला आहे. त्याबद्दल उदगिरी शुगर्सला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवले आहे. नवी दिल्ली येथे देशातील साखर आणि इथेनॉलच्या सर्वात मोठ्या SEIC 2024 परिषदेच्या तिसरी आवृत्तीत (३rd edition of the Sugar and Ethanol India Conference) उदगिरी शुगर्सला ‘बेस्ट एन्हायरमेंट फ्रेंडली शुगर मिल’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. अभिनेत्री भाग्यश्रीच्या हस्ते डॉ. राहुलदादा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here