साओ पाउलो : जगातील सर्वात मोठे साखर उत्पादक आणि निर्यातदार ब्राझीलमध्ये ऊस क्षेत्र २०२३ मध्ये १२ वर्षांमध्ये सर्वात कमी झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि मक्का अशा अधिक लाभदायक पिकांकडे आपला मोर्चा वळवला आहे. २०२२-२३ मधील ऊस पिकाच्या आपल्या अंतिम रिपोर्टमध्ये ब्राझीलची अन्न पुरवठा एजन्सी Conab ने म्हटले आहे की, ऊसाचे क्षेत्रफळ घटून ८.२९ मिलियन हेक्टर झाले आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत हे क्षेत्र ०.४ टक्क्यांनी कमी आहे आणि २०११ नंतर सर्वात कमी आहे.
Conab ने सांगितले की, अनेक जमीनदार जे ऊस शेतीसाठी जमीन लीजवर देत होते, त्यांनी आपले करार समाप्त केले आहेत. आणि त्याऐवजी सोयाबीन, मक्का अशी नगदी पिके लावण्यात आल्याची शक्यता अधिक आहे.
ब्राझीलमधील उसाचे लागवड क्षेत्र क्रमांक २ परानामध्ये ऊस लागवडीत ९ टक्क्यांची घसरण झाली आहे. एकीकडे ब्राझीलमधील ऊसाचे क्षेत्र कमी होत आहे, दुसरीकडे जागतिक बाजरपेठेला साखर तुटवड्याचा सामना करावा लागला आहे. भारतामध्ये उत्पादन कमी होईल अशी अपेक्षा आहे आणि कोरड्या हवामानामुळे साखर उत्पादन कमी झाले आहे. अशा स्थितीत साखरेचे दर सातत्याने वाढत आहेत.
ब्राझीलच्या ऊस क्षेत्रातील मोठ्या घसरणीनंतरही हंगामात चांगले उत्पादन मिळाले आहे. ब्राझीलने आपल्या २०२२-२३ या ऊस पिक हंगामात ५९८.३ मिलियन टनाच्या आपल्या पुर्वानुमानात ५.४ टक्के अथवा ६१०.१ मिलियन टनाच्या वाढीसह उत्पादन मिळवले. साखर उत्पादन एकूण ३७.०४ मिलियन टन, ६ टक्के वाढीसह Conab च्या आधीच्या अनुमानापेक्षा १.८ टक्के अधिक झाले आहे. तर उसावर आधारित इथेनॉल उत्पादन ०.५ टक्के वाढून २६.५२ बिलियन लिटर झाले आहे.