नैरोबी : केनियामध्ये वाढत्या महागाईमुळे जानेवारी ते जून यादरम्यान साखरेच्या खपात ४२ टक्क्यांची घसरण झाली आहे असे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. महागाईमुळे हवालदिल झालेल्या गरीब कुटूंबांनी साखरेचा वापर बंद केला आहे अथवा त्यामध्ये कपात केली आहे. त्यामुळे महागाईचा केनियातील लोकांवर किती परिणाम झाला आहे, हे दिसून येत आहे.
याबाबत Nation.africa मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, एकूण मासिक साखर विक्री जानेवारीत ६५,९२१ टनावरून घटून जूनमध्ये ३८,१०२ टनावर आली. ही घसरण ४२.२ टक्के आहे.
साखरेच्या किमती प्रती २ किलो उच्चांकी KSH ५०० पर्यंत पोहोचल्या आहेत. उसाच्या तुटवड्यामुळे केनियातील साखर कारखान्यांना गाळप बंद करावे लागले आहे. याशिवाय कृषी आणि अन्न प्राधिकरणाच्या निर्णयाचा कारखान्यांसह व्यापाऱ्यांवरही परिणाम झाला आहे.