बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे, आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच
सांगली : वार्ताहर
ऊस पिकाला जास्त पाणी लागते असे म्हणणे चुकीचे आहे. उलट हे पीक कोणत्याही वातावरणात तग धरून राहू शकते, याच विचार करायला हवा. ऊस पिकात ठिबक सिंचनचा वापर करून रासायनिक खते, पाणी आणि श्रमाची बचत करता येईल, असे मत प्रतिपादन वसंतदादा साखर संघाचे संचालक विकास देशमुख यांनी व्यक्त केले.
क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित ऊस पीक चर्चासत्र आणि शिवार फेरी आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी क्रांती उद्योग समुहाचे प्रमुख अरुण लाड होते. कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव खुर्द येथे हा कार्यक्रम झाला.
पश्चिम महाराष्ट्राची भौगोलिक रचना ऊस पिकासाठी अनुकूल आहे. त्यामुळे शेतकर्यांना एकरी २०० टनांपर्यंत उत्पादन घेणे सहज शक्य आहे, असे मत देशमुख यांनी व्यक्त केले.
ऊस शेती शास्त्रोक्त पद्धतीने केली पाहिजे, असे मत वसंतदादा ऊस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ आर. एस. हापसे यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, ‘जमिनीला अनुसरून उसाची निवड व योग्य वयाचे म्हणजेच नऊ ते दहा महिन्यांचे बियाणे घेऊन मातीची तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच खत व्यस्थापन करणेही आवश्यक आहे. या पद्धतीने जर ऊस शेती केली तर हमखास निश्चित उत्पादन काढता येते. याचबरोबर उसाला लागणारे 16 अन्नद्रव्ये ठिबकच्या माध्यमातून द्यावीत.’ तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती केली तर, नक्की फायदा होतो, असे मत क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी व्यक्त केले.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp