मेरठ : दितौली गावात ड्रोनने दहा लिटर किटकनाशकाची टाकी उचलून काही मिनिटांतच पिकांवर त्याची फवारणी केली. हे पाहून उपस्थित शेतकरी आश्चर्यचकीत झाले. कारण, या कामासाठी शेतकऱ्यांना अनेक दिवस लागत होते.
शेतकऱ्यांसाठी ड्रोनचा वापर करण्याची माहिती सरदार वल्लभ भाई पटेल कृषी विद्यापीठाच्या (एसव्हीबीपीएसयू) कृषी संशोधकांकडून केला जात आहे. कृषी संशोधक विविध गावात जाऊन ड्रोनचे प्रदर्शन करीत आहेत. शेतकऱ्यांना पिकांमध्ये चांगल्या प्रकारे फवारणी करता येण्यासह जे हाताने फवारणी करतात, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिनेही ही बाब मोलाची ठरणार आहे. यासोबतच शेतीमधील कामगारांच्या तुटवड्यावरही हा प्रभावी उपाय ठरणार आहे.
कृषी संशोधकांनी सांगितले की, हे तंत्र शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. ऊस आणि भात या पिकांमध्ये याचा चांगला वापर होऊ शकतो. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना औषध फवारणी करताना पोहोचणे अवघड ठरते. काहीवेळा पिकाचा काही भाग फवारणीविना राहतो. एका ड्रोनची किंमत सहा लाख रुपये असून पंधरा मिनिटात एक एकरवर फवारणी करता येते. चेन्नईतील एका कंपनीने या ड्रोनच्या पुरवठ्यासाठी कृषी विद्यापीठाशी करार केला आहे. एसव्हीबीपीएयूचे कुलपती आर. के. मित्तल यांनी सांगितले की, ड्रोनचे तंत्रज्ञान युवकांना शेतीकडे आकर्षित करेल अशी अपेक्षा आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link