चीनी मंडी, कोल्हापुर: भारतीय शास्त्रज्ञानी तयार केलेल्या व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या ‘ड्रोन्स’चा वापर आता महाराष्ट्राच्या शेतीकरिता करण्यात येणार आहे. पिकानुसार पेरक्षेत्र मोजणी, गारपीट, पीक नुकसान क्षेत्र मोजणी, अपेक्षित उत्पादनाचा अंदाज, पिकांवरील रोगांचे पूर्वानुमान, अचूक निदान व उपाय तसेच विविध वृक्षांच्या बियांचे अचूक रोपण व त्याद्वारे वनवृद्धी अश्या विविध गोष्टींकरिता ड्रोन्सचा वापर करण्यात येणार आहे.
तसेच प्रत्येक हंगामातील प्रत्येक पिकाचे पेरक्षेत्र मोजणे, रोगाचे पूर्वानुमान देखील काढता येतील, शेतीत होणाऱ्या नुकसानाचा अंदाज देखील ड्रोन द्वारे काढता येणार आहे, ‘नॅनो मिस्ट टेक्नॉलॉजी’चा वापर करून ड्रोन द्वारे कीडनाशकांची फवारणी करता येणार आहे त्यामुळे आता शेती करणे आणखीन सुकर बनणार आहे.
आता महाराष्ट्रात भारत सरकारच्या बंगळूर येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ संस्थेच्या ‘एअरोस्पेस इंजिनियरिंग’ विभागाद्वारे प्रकल्पाच्या अंमलबजावणीस सुरुवात होणार आहे.