रिओ डी जेनेरो : चालू हंगामाच्या पिकापेक्षा २०२५-२६ मधील दुष्काळाच्या संभाव्य परिणामाबद्दल अधिक चिंता आहे, असे ब्राझीलमधील इथेनॉल उत्पादक, रायझेन (Raizen) चे मुख्य कार्यकारी रिकार्डो मुसा यांनी म्हटले आहे. ब्राझीलमध्ये अनेक भागाला दीर्घ काळापासून दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. ज्याचा परिणाम उसासारख्या पिकांच्या पेरणीवर तसेच नवीन पिकांच्या चक्रावर होत आहे. अलिकडच्या काही महिन्यांत देशभरातील वणव्यांमुळे शेतकरी अधिक चिंतेत आहेत.
‘रायझेन’चे सीईओ रिकार्डो मुसा यांनी रिओ डी जनेरियो येथे एका कार्यक्रमादरम्यान रॉयटर्सला सांगितले की, सध्याची त्यांची सर्वात मोठी चिंता पुढील वर्षीच्या पिकाची आहे, कारण सध्याचा दुष्काळ आणखी जास्त काळ टिकेल अशी भीती त्यांना वाटते. ते म्हणाले, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये हवामान कसे असेल याकडे आम्ही लक्ष देत आहोत. पुढील काही महिन्यांत संभाव्य प्रदीर्घ दुष्काळामुळे आगीचे नकारात्मक परिणाम वाढू शकतात. जरी सध्याच्या आगीच्या चक्राचा भौतिक परिणाम अद्याप रायझेनवर झालेला नाही.