भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अमित शाह यांची मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे भेट घेतली आणि केंद्रीय गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल महाराष्ट्राच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले. विविध विषयांवर यावेळी चर्चा करतानाच केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळालेली दुष्काळ निवारणासाठीची मदत आणि राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी केलेल्या उपाययोजना इत्यादींची माहिती यावेळी त्यांना दिली.
केंद्रीय मंत्री श्री राजनाथसिंह यांचीही भेट घेत देशाचे संरक्षण मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.