उभ्या ऊस पिकावर अज्ञाताने फिरवला ट्रॅक्टर

जालना : शेतातील अर्धा एकर उसामध्ये अज्ञाताने ट्रॅक्टर फिरवून नुकसान करण्याचा प्रकार गोंदी येथे उघडकीस आला. गुरुवारी ही घटना घडली. या प्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारात गोंदी येथील शेतकरी भिवराज सोळुंके यांच्या शेतात हा प्रकार घडला. सुमारे एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. मंडल अधिकारी कृष्णा एडके यांनी घटनास्थळी पंचनामा केला. अज्ञाताने ट्रॅक्टर फिरवून अर्धा एकर ऊस मोडून पिकाचे नुकसान केले आहे असे भिवराज सोळुंके यांनी दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे. गोंदी पोलिस ठाण्यात अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक शेख तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here