बुडत्या पाकिस्तानला मिळाला आधार: एक बिलियन डॉलर मदतीचे आश्वासन

कंगाल स्थितीत पोहोचलेल्या पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून आपले बेल आऊट पॅकेज मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यांचा मार्ग अतिशय खडतर आहे. अशात पाकिस्तानने आपल्या मित्र देशांकडून आर्थिक मदत मागितली आहे. अडचणीत आलेल्या पाकिस्तानसाठी एक चांगली बाब म्हणजे संयुक्त अरब अमिरातने पाकिस्तानला १ बिलियन डॉलरच्या आर्थिक मदतीचे आश्वासन दिले आहे. हे पैसे मिळविण्यासाठी आता कागदोपत्री प्रक्रिया सुरू झाली आहे.

एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, याबाबत माहिती देताना पाकिस्तानचे अर्थमंत्री इशार डार यांनी सांगितले की, यूएईच्या अधिकाऱ्यांशी चर्चेनंतर पाकिस्तानला १ बिलियन डॉलर मदत देण्याबाबत सहमती झाली आहे. याची माहिती आयएमएफलाही देण्यात आली आहे. आता स्टेट बँक ऑफ पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातच्या अधिकाऱ्यांदरम्यान कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. त्यांनी असेही सांगितले की, चीनने पाकिस्तानला १.३ बिलियन डॉलरचे कर्ज आधीच दिले आहे. त्यापैकी ३०० मिलियन डॉलर कर्जाचे पुर्नगठण केले जाईल. अशा प्रकारे पाकिस्तानची परकीय गंगाजळी वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पाकिस्तान सध्या प्रचंड मोठ्या आर्थिक संकटात आहे. त्यांनी आयएमएफकडे १.१ बिलियन डॉलरच्या पॅकेजची मागणी केली आहे. नोव्हेंबर २०२२ पासून पाकिस्तानला या पॅकेजची प्रतीक्षा आहे. यापूर्वीही यूएईने पाकिस्तानला मदत केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here