भारतीय साखरेमुळे दुबई शुगर रिफायनरी उत्पादन थांबवले

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

दुबई : दुबईतील अल खलीज् शुगर हा एका बंदरावर असणारा जगातील सर्वांत मोठा साखर शुद्धीकरण प्रकल्प आहे. त्यांनी दुबईमध्ये पुन्हा साखर उत्पादन थांबवले आहे. गेल्या काही महिन्यांत उत्पादन थांबवण्याची त्यांची ही दुसरी वेळ आहे.

डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून तसेच फेब्रुवारीच्या सुरुवातीपर्यंत साखर उत्पादन थांबवण्यात आले होते. कारण, भारतातून मोठ्या प्रमाणावर साखर आल्याने अल् खलीजच्या साखरेला मागणी घटली होती. या संदर्भात कंपनीने अधिकृत माहिती देण्यास नकार दिला आहे.

विशेष म्हणजे, मुस्लिम समाजाचा रमजान उत्सव तोंडावर आला असताना साखर उत्पादन बंद करण्यात आले आहे. रमजान काळात मिठाईला मागणी वाढते. उपवासानंतर इफ्तारला मोठ्या प्रमाणावर गोड पदार्थ खाल्ले जातात. साखर शुद्धीकरण प्रकल्पाचा नफाही घटला आहे.

थायलंड आणि भारतात साखरेचे बंपर उत्पादन झाल्यामुळे लंडनच्या बाजारात साखरेचे दर कोसळले आहेत. गेल्या दहा वर्षांतील निचांकी पातळीवर दर पोहोचले आहेत. भारतात देण्यात येत असलेल्या अनुदानामुळे तेथील साखर मोठ्या प्रमाणावर जागतिक बाजारात येऊ लागली आहे. त्यासाखरेच्या स्पर्धेला अल् खलीजलाही तोंड द्यावे लागत आहे.

दुबईतील साखर शुद्धीकरण प्रकल्पांना गेल्या काही वर्षांत वेगळ्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे. आखाती देशांमध्ये साखर शुद्धीकरण प्रकल्प मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहेत. त्यामुळे दुबईतील प्रकल्पांमधील साखरेची मागणी घटली आहे. इराकसारखी साखरेची मोठी बाजारपेठ त्यांना गमवावी लागली आहे. कारण तेथे इत्तेहादने साखरेचा शुद्धीकरण प्रकल्प सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here