भारताच्या अतिरिक्त साखर उत्पादनामुळे  फटका बसलेली दुबईतील अल-खलीज रिफायनरी पुन्हा सुरू

 

बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे ,आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच

नवी दिल्ली : चीनी मंडी

तब्बल दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर दुबईतील अल-खलीज शुगर ही रिफायनरी पुन्हा सुरू होत आहे. डिसेंबर २०१८च्या दुसऱ्या आठवड्यापासून ही रिफायरनी बंद करण्यात आल होती. यासाठी भारतातील अतिरिक्त साखर उत्पादनाला जबाबदार धरण्यात आले होते.

अल-खलीज शुगर ही सागरी बंदरावरील जगातील सर्वांत मोठी रिफायरी आहे. त्यामुळे ही रिफायनरी दोन महिने बंद असल्याची साखर जगतात मोठी चर्चा होती. या संदर्भात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जमाल अल- घुरेयर यांनी दुबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. भारतातील अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अल-खलीज शुगर पुरवठा करत असलेल्या बाजारपेठेत साखरेच्या किमती घसरल्या आणि कंपनीला मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागले, असा आरोप घुरेयर यांनी केला आहे.

भारतात यंदा उच्चांकी साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी भारतातील साखर मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय बाजारात येत आहे. ऊस उत्पादकांच्या बिलांचा प्रश्न उपस्थित झाला असला तरी, उसाची लागवड आजही फायद्याची आहे. सरकारकडून मिळत असलेल्या अनुदानाच्या जोरावर भारतातील साखर उद्योग अतिरिक्त पुरवठ्याचा सामना करत आहे.

या संदर्भात घुरेयर म्हणाले, ‘सरकारकडून मिळत असलेल्या अनुदानामुळे भारताच्या साखर उद्योगाचा फटका आशिया खंडात दिसत आहे. त्यामुळे तुम्ही भारतासोबत स्पर्धा कशी करू शकाल?. ऑक्टोबरमध्ये हंगाम सुरू झाल्यापासून भारतातून १० लाख टनहून अधिक साखर निर्यात झाली आहे. यामुळे आधीच आम्ही आर्थिक संकटात सापडलो आहोत. पुढच्या काळात भारतातील आणखी साख बाहेर येणार आहे. त्यावेळी परिस्थिती आणखीनच बिकट असेल.’

भारताने कारखान्यांना ५० लाख टन साखर निर्यात करण्याचे टार्गेट दिले आहे. अल-खलीज शुगरला फटका बसण्यासाठी हे पुरेसे आहे, असा दावा घुरेयर यांनी केला आहे. अल-खलीजकडून साखर विक्री होत असलेल्या महत्त्वाच्या बाजारपेठेत भारतीय साखरेमुळे कंपनीला नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. दुबईच्या या रिफायनरीतून इराकला आता साखर जाणार नाही. कारण, इत्तेहाद रिफायनरीमध्ये आता काम सुरू झाले आहे. त्याचवेळी आखाती देशांच्या सीमांवर मोठ्या प्रमाणावर रिफायनरी उभ्या होत असल्याने कंपनीचा व्यावसाय कमी होत आहे.

अल-खलीजची दुसरी मोठी बाजारपेठ असलेल्या सौदी अरेबियामध्येही आता दोन मोठे कारखाने सुरू होत आहेत. त्यामुळे कंपनीला आणखी मोठ्या स्पर्धेला समोरे जावे लागणार आहे. अफ्रिकेतही कंपनीला वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. सुदान सारख्या देशांमध्ये साखर खरेदीसाठी निधी नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे तेथे कंपनीला फटका बसत आहे. मुळात या नव्या रिफायनरी या कधी सुरू कधी बंद अशा परिस्थितीत असतात. त्यामुळे त्या किती काळ सुरू राहतात यावर साखरेची बाजारपेठ अवलंबून आहे.

युरोपमधून मोठ्या प्रमाणावर साखर बाहेर पाठवण्यात येऊ लागल्याने अल-खलीजने २०१८मध्ये उत्पादन २० टक्क्यांनी कमी केले. आमच्या कंपनीसारख्या इतर रिफायनरीजसाठी २०१८ हे वर्ष फारसे समाधानकारक नव्हते, असे मत घुरेयर यांनी व्यक्त केले आहे.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp 

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here