मुंबई : यंदा सुरू असलेल्या आर्थिक वर्षात जवळपास 16 लाख नोकर्या कमी झाल्या आहेत. मागील वर्षी एकूण 89.7 लाख नोकर्यांची निर्मिती झाली होती. त्यात यंदाच्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात घट होणार आहे. या अहवालानुसार आसाम, बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, ओडिशा आदी राज्यांमधील नागरीक नोकरीच्या निमित्ताने परराज्यात, दुसर्या ठिकाणी वास्तव्यास आहेत, त्यांच्याकडून घरी पाठवण्यात येणार्या रक्कमेत घट झाली असल्याचे समोर आले आहे.
आर्थिक मंदीचा परिणाम देशभरातील रोजगार निर्मितीवरही पडत आहे. आर्थिक मंदीने रोजगाराच्या संधी हिरावल्याचे उघड झाले आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात कमी नोकर्यांची निर्मिती झाली आहे. पंजाब, गुजरात, महाराष्ट्र या राज्यात रोजगाराच्या संधी होत्या. मात्र, याच राज्यात रोजगारांच्या संधी कमी झाल्या असल्याचे समोर आले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.