वातावरण बदलामुळे गळीत हंगामापूर्वीच उसाला तुरे फुटले, शेतकरी धास्तावले

कोल्हापूर : ऊस गळीत हंगामाला सुरुवात झाली नसताना, वातावरणातील सततच्या बदलाने उसाला तुरे फुटले असल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम ऊस उत्पादनावर होणार असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. कमी जास्त पाऊस, बदलते वातावरण या तडाख्यातून वाचलेल्या उसाला सध्या तुरा फुटल्याने यंदा उसाचे वजनही घटणार असल्याने याचा परिणाम होणार असून ऊस उत्पादनात मोठी घट होणार आहे. तसेच विधानसभा निवडणुकीमुळे ऊस गाळप हंगामाचे गणित बिघडले आहे.

याबाबत शेतकरी विजयसिंह पाटील यांनी सांगितले की, कमी खर्च आणि अधिक उत्पादन होण्यासाठी ऊस लागवड करण्यास शेतकरी प्राधान्य देतात. मात्र यावर्षी ऊस गळीत हंगामापूर्वीच उसाला तुरे फुटल्याने ऊस उत्पादनाला मोठा फटका बसणार आहे. दरम्यान, वाढलेले खते, बियाणे, मोलमजुरी, मशागतीच्या दराचा कसा ताळमेळ घालयचा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. याशिवाय, उशिरा गळीत हंगाम आणि उसाच्या वजनात येणारी संभाव्य घट, तोडणी टोळी मजुरांनी कारखान्यांकडून घेतलेली अॅडव्हान्स रक्कम कशी फिटणार? असा प्रश्न मुकादमांना पडला आहे. ऊस तोडणी मजुरांनी घेतलेली अॅडव्हान्स लाखात असल्याने ती रक्कम हंगाम कालावधीत कशी फिटणार, अशा चिंतेत ऊस वाहतूक तोडणी मालक आहेत.

साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here