बिजनौर : उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाने अनेक ठिकाणी पाणी साठले आहे. त्यामुळे विभागातील कारखान्यांच्या ऊस तोडणी आणि पुरवठ्यात अडचणी आल्या आहेत. ऊस पुरवठा न झाल्याने बहुतांश कारखान्यांना आपले गाळप थांबवावे लागले आहे.
द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार बिजनौर साखर कारखान्याचे प्रशासन अधिकारी ए. के. सिंह यांनी सांगितले की, सकाळपासून आमच्या कारखान्याकडे शेतकऱ्यांकडून ऊस आलेला नाही. ऊसाची कमतरता असल्याने बिजनौर साखर कारखाना अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला आहे.
बिजनौर येथील गडाना गावातील ऊस उत्पादक परवीर सिंह यांनी सांगितले की, पावसामुळे ऊसाच्या शेतांमध्ये पाणी भरले आहे. आणि शेतकरी आपला ऊस तोडू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी कारखान्यांना ऊस पाठवणे बंद केले होते.
साखरेचे कोठार मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागातील बहुसंख्य जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला आहे.