साखर विक्री न झाल्यामुले कारखाने अडचणीत

कोल्हापूर, ता. 3 :कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील गेल्या वर्षीसह यावर्षीची 70 लाख साखर विक्री झालेली नाही. यात शेतकऱ्यांच्या एफआरपी चे पैसे अद्याप दिलेले नाही, अशा कारखान्यांना “कोणी साखर घेता का साखर” असं म्हणण्याची वेळ आली आहे.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील 70 टक्के साखर गोदामातच पडून आहे. कोल्हापूर विभागात एकूण 38 साखर कारखाने असून, कोल्हापूर जिल्ह्यात 22 तर सांगली जिल्ह्यात 16 कारखाने आहेत. गेल्या गळीत हंगामामध्ये (सन 2018) साखरेचे दर कोसळल्याने साखर उद्योगावर मोठे संकट आले आहे. कोल्हापूर मध्ये 24 लाख मेट्रिक टन साखर शिल्लक होती. यंदाही 51 लाख मेट्रिक टन उत्पादन झाले.

कोल्हापूर विभागातील साखरेला यापूर्वी पश्चिम बंगाल, पूर्वेत्तर भारतात मोठी मागणी होती. पण कोल्हापूरचे मार्केट उत्तर प्रदेशने काबीज केले आहे. पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातील अंतर कमी असल्याने वाहतूक खर्च कमी पडतो. त्यामुळे कोल्हापूर विभागातील साखर महाग पडते. साखर उद्योगापुढे निर्माण झालेल्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here