बिजनौर: आगामी गाळप हंगाम सुरु होण्यात आता काहीच दिवस बाकी आहेत, पण अनेक कारखान्यांनी गेल्या हंगामाचे पैसे अजूनही भागवलेले नाहीत. पश्चिम उत्तर प्रदेश च्या कारखान्यांमध्ये आता ही गेल्या हंगामापासून शेतकऱ्यांचे बरेच पैसे येणे बाकी आहेत.
प्रलंबित थकबाकीमुळे अडचणीत आलेले शेतकरी आपले ऊस अत्यंत किरकोळ दरात खाजगी गुऱ्हाळांना किंवा कोल्हुना विकत आहेत. कोल्हू 230-250 रुपये प्रति क्विंटल ऊसाला दर देतात, तर कारखाने यापेक्षा जास्त दर देतात. कोल्हु ने परिचालन सुरु केले आहे, तर साखर कारखाने ऑक्टोबरच्या मध्यातून गाळप सुरु करणार आहेत. जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी सांगितले की, कारखाना अधिकाऱ्यांना ही सर्व बाकी भागवण्यास सांगितले आहे. आशा आहे की, ही बाकी लवकरच भागवली जाईल.
उत्तर प्रदेश मध्ये ऊस शेतीचे क्षेत्रफल जवळपास 27.38 लाख हेक्टेयर आहे. राज्यात 119 साखर कारखाने आहेत, जे अधिकतर पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये केंद्रित आहेत. एकूण 40 लाख शेतकरी राज्यात ऊस शेतीशी संबंधित आहेत. राज्यात साखर कारखान्यांकडुन गेल्या वर्षाचे जवळपास 8,500 करोड़ रुपये बाकी आहेत. शेतकऱ्यांची मागणी आहे की, ऊसाचा दर 325 रुपयाहून वाढवून 450 रुपये प्रति क्विंटल केला जावा. उत्तर प्रदेश मध्ये 8,000 पेक्षा अधिक कोल्हू आणि गुन्हाळांनी गाळप सुरु केले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.