न्यू लबेरिया (अमेरिका) : चीनी मंडी
यंदाच्या हिवाळ्यात झालेल्या पावसाचा सर्वाधिक फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. गेल्या तीस वर्षांतील हे सर्वांत खराब वर्ष आहे, अशी प्रतिक्रिया न्यू लबेरियातील रिकी गोन्सोलिन या ऊस उत्पादक शेतकऱ्याने दिली. पावसामुळे शेतीचे आणि अवजारांचे झालेले नुकसान एक लाख डॉलरच्या घरात गेले आहे.
या संदर्भात रिकी गोन्सोलिन म्हणाले, ‘पावसामुळे शेतांमध्ये निसरडे होण्याचा प्रकार अनेकवेळा झाला. यामुळे यावर्षी आम्ही नेहमीपेक्षा २५ हजार गॅलन इंधन जास्त वापरले आहे. यासाठी मनुष्यबळ किती लागले याची गणना मी अजून केलेलीच नाही.’
उसाच्या उत्पादनाविषयी सांगायचे झाले तर, गेल्या वर्षी पेक्षा यंदा मी जास्त उत्पादन घेतले आहे. पण, त्यासाठीचा उत्पादन खर्च आणि तोडणी खर्च खूपच वाढला, असे गोन्सोलिन यांनी सांगितले. ख्रिसमसनंतर साखर कारखान्यांना १५ जानेवारीच्या आता ऊस देण्यासाठी शेतकरी दिवसभरात १३ तास काम करत होते. पण, यंदा पावसाने दिलेल्या तडाख्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या पुढच्या हंगामावरही होणार आहे, अशी भीती गोन्सोलिन यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, ‘या वर्षीच्या पिकावर आम्ही खूपच समाधानी आहोत. पण, हे पिक साखर कारखान्यांपर्यंत पोहचवण्यात आमचे किती पैसे खर्च झाले आणि पुढच्या वर्षी आम्हाला आणखी काय आव्हान असणार याकडे आम्ही अजून लक्ष दिलेले नाही. परिसरातील काही शेतकऱ्यांच्या शेतात अजूनही ऊस दिसत आहे. त्यांना यंदांच्या हंगामासाठी ऊस तोडणे शक्यच झाले नाही.’ अमेरिका सरकारने शटडाऊनची घोषणा केली आहे. पण, अजूनही इतर उद्योगांप्रमाणे साखर उद्योगाला याचा अद्याप फटका बसलेला नाही, अशी माहिती गोन्सोलिन यांनी दिली.
डाउनलोड करा चिनीमण्डी न्यूज ऐप: http://bit.ly/ChiniMandiApp