यह न्यूज़ सुनने के लिए इमेज के निचे के बटन को दबाये
नवी दिल्ली : चीनी मंडी
भारतामध्ये साखर उद्योगाला देण्यात येत असलेल्या अनुदानाचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर झाला आहे. साखरेचे दर त्यामुळे घसरले असून, सर्वाधिक फटका ब्राझीलला बसला आहे. ब्राझीलमधील ऊस उत्पादकांचे १५० कोटी डॉलरचे नुकसान झाल्याचा दावा ब्राझीलकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात जागतिक व्यापार संघटनेत भारताविरुद्ध कारवाईसाठी तक्रार दाखल करण्याची सर्व तयारी ब्राझीलने पूर्ण केली आहे.
भारतात साखरेचे अतिरिक्त उत्पादन झाल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. देशातील बाजाराची गरज २६० लाख टन आणि उत्पादन सलग दोन वर्षे ३०० लाख टनापेक्षा जास्त झाल्यामुळे भारतापुढे पेच निर्माण झाला. देशातील बहुतांश साखर निर्यात करून साखर उद्योग सावरण्याच्या हेतूने सरकारने निर्यातीला प्रोत्साहन दिले. त्यासाठी वाहतूक अनुदान जाहीर करण्यात आले.
भारताच्या अनुदानाला पहिल्यांदा ऑस्ट्रेलियातून विरोध झाला. ऑस्ट्रेलियाने जागतिक व्यापार संघटनेमध्ये भारताच्या विरोधात मोट बांधण्यास सुरुवात केली. त्यात ऑस्ट्रेलियाने ब्राझीलला आपल्या सोबत उभे केले. गेल्या काही महिन्यांत ब्राझीलने सातत्याने भारतातील अनुदानाचा मुद्दा उपस्थित केला आहे. भारतानेही कृषी क्षेत्राला जागतिक व्यापार संघटनेच्या नियामाबाहेर कोणतेही अनुदान दिले नसल्याची भूमिका सातत्याने मांडली आहे. भारताविरोधातील याचिकेला मूर्त स्वरूप देण्याची तयारी ब्राझील सातत्याने करत होता. अनेकदा ब्राझीलकडून भारताविरोधात निवेदन प्रसिद्ध करण्यात आली होती. आता जागतिक व्यापार संघटनेने भारताविरोधात कारवाई करावी, यासाठीच्या याचिकेची पूर्ण तयारी ब्राझीलने केली आहे.
डाउनलोड करे चीनीमंडी न्यूज ऐप: http://bit.ly/ChiniMandiApp
Sugar control order me sabhi chini milloko saman nyay nahi milta CD (sugar) Control order March 2019..me vishesh dhyan dege tho mill ko can payment deneme madat hogi.