नव्या वाणांमुळे पाच वर्षात ४२,००० शेतकरी वळले ऊसाकडे

मुजफ्फरनगर : गेल्या पाच वर्षात उसाच्या नव्या प्रजातींमुळे चांगले उत्पादन मिळत असल्याचे पाहून मुजफ्फरनगरमध्ये किमान ४२,००० शेतकरी ऊसाच्या शेतीकडे वळले आहेत. त्यामुळे उसाचे लागवड क्षेत्र आणि ऊस उत्पादनात मोठी वाढ दिसून आली आहे. यापूर्वी शेतकरी एका एकरमध्ये ५० क्विंटल उसाचे उत्पादन घेत होते आता त्यांना ७० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असल्याचे जिल्हा ऊस अधिकारी आर. डी. द्विवेदी यांनी सांगितले.

द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, द्विवेदी यांनी सांगितले की, २०१५ मध्ये १.६ लाख शेतकऱ्यांच्या तुलनेत आता जवळपास दोन लाख शेतकरी उसाचे उत्पादन घेत आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१६-१७ या वर्षात ऊस उत्पादन १,२६,८७२ हेक्टर क्षेत्रात घेतले जात होते. हे क्षेत्र वाढून आता २०२१-२२ मध्ये १,६८,०१५ हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. गेल्या पाच वर्षात ऊस क्षेत्रात ४२,५९६ हेक्टरची वाढ झाली आहे. जिल्ह्यात आठ साखर कारखान्यांनी २०२१-२२ या हंगामासाठी ऊस गाळपाची तयारी सुरू केली आहे. या कारखान्यांनी ऊस उत्पादकांना २०१५-१६ मध्ये २२०० कोटी रुपयांची ऊस बिले दिी होती. तर गेल्या हंगामात २०२०-२१ मध्ये ३२०० कोटी रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाले आहेत. ऊसाच्या बिलांमध्ये गेल्या पाच वर्षात १,००० कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here