रुडकी : गेल्यावर्षीपेक्षा यंदा उसाचे क्षेत्र जास्त असूनही साखर कारखान्याला पुरेसा ऊस मिळत नाही. त्यामुळे कारखान्याने उसाच्या दररोजच्या मागणीत घट केली आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यात भात, गहू, कडधान्य आणि तेलबिया आदी पिकांच्या तुलनेत जास्त नफा असल्याने उसाची सर्वाधिक लागवड केली जाते. याशिवाय दरवर्षी उसाच्या क्षेत्रातही वाढ होत आहे. यावेळीही गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ११ टक्के अधिक क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. तरीही गळीत हंगामाच्या सुरुवातीलाच उसाचा तुटवडा जाणवत आहे.