हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
लंडन: चीनी मंडी
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरण्याबरोबरच कच्च्या साखरेच्या दरांमध्येही घसरण झाली आहे. कच्च्या साखरेचे दर गेल्या महिनाभरातील सर्वांत निचांकी पातळीवर पोहोचले आहेत. कच्च्या साखरेचे दर प्रति पाऊंड ०.३ सेंटसनी किंवा २.३ टक्क्यांनी खाली आले आहेत. २५ जानेवारीनंतर रोजच्या चढ उतारांमध्ये ही सर्वांत मोठी घसरण सांगितली जाते.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेल उत्पादक आणि निर्यातदार देशांना, तेलाच्या किमती वाढवण्या संदर्भात ‘रिलॅक्स अँड टेक इट इझी’, असा सूचक इशारा दिला आहे. त्यानंतर सोमवारी जागतिक बाजारात तेलाचे दर ३ टक्क्यांनी खाली आले आहेत. तेलाचे दर घसरल्याचा परिणाम ब्राझीलमधील साखर उत्पादनावर होतो. तेलाचे दर घसरल्याने तेथील साखर कारखाने इथेनॉल उत्पादन कमी करतात आणि त्यामुळे साखरेचे उत्पादन वाढू लागते. परिणामी अतिरिक्त पुरवठ्याच्या शक्यतेने दर घसरू लागतात. गेल्या आठवड्या साखरेचे दर गेल्या साडे तीन महिन्यांतील उच्चांकी पातळीवर होते.
मध्य अमेरिका, थायलंड, भारत, आणि ब्राझील येथून आंतरराष्ट्रीय बाजारात ७ लाख ५० हजार टन साखर येणार आहे, अशी माहिती सुकडेन फायनान्शिअलचे प्रमुख टॉम कुजवा यांनी सांगितले. सध्या मे रिफाइन्ड साखरेचे दर २.५ टक्क्यांनी घसरून ३५०.५० डॉलर प्रति टनवर स्थिरावले आहेत.
दरम्यान, इंडोनेशियाने त्याच्या पाम तेलावर भारताने लागू केलेले आयात शुल्क ४५ टक्क्यांपर्यंत खाली आणावे, असे आवाहन केले आहे. पाम तेलातील स्पर्धक असलेल्या मलेशियाशी स्पर्धा करण्याचा इंडोनेशियाचा मानस आहे. भारताकडे पाम तेलाची मोठी बाजारपेठ म्हणून ते पाहत आहेत आणि पाम तेलाच्या बदली साखर आयात करण्याची त्यांची तयारी आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp