लखीमपूर खिरी : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाचे पैसे वेळेवर न दिल्याने शेतकऱ्यांचा ऊस शेतीबाबत अपेक्षाभंग झाल्याचे चित्र दिसते. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी उसाऐवजी अन्य नकदी पिकांकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऊस लागणीचे क्षेत्र घटत असल्याचे दिसून आले.
ऊस विभागाने केलेल्या ७३ टक्के सॅम्पल सर्व्हेत ३.३१ टक्के क्षेत्र घटल्याचे दिसून आले. कुंभी परिसरामध्ये सर्वाधिक १२.५७ टक्के, ऐरा क्षेत्रामध्ये ९.१९ टक्के, गोला क्षेत्रामध्ये ५.५० टक्के आणि पलिया परिसरात ६.५५ टक्के ऊसाची लागण कमी झाली आहे. पूर्ण जिल्ह्यात ऊसाचे एकूण ४४३.१३२ हेक्टर क्षेत्र कमी झाल्याचे दिसून आले.
गेल्या वर्षी, २०२०-२१ मध्ये जिल्ह्यात उसाचे एकूण क्षेत्र ३,३६,९३३ हेक्टर होते. त्याआधीच्या वर्षांमध्ये सुमारे तीन लाख हेक्टरच्या आसपास होते. ऊस पिकाचे क्षेत्र सातत्याने वाढत असल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांना इतर पिके घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. आणि उसाचे क्षेत्र घटविण्यासाठी प्रयत्न केले. तरीही ऊस क्षेत्र वाढत असल्याचे दिसून आले होते.
दुसरीकडे साखर कारखानदारांकडून उसाचे पैसे देण्यात टाळाटाळ वाढत गेली. यंदाच्या सर्व्हेत त्याचे परिणाम दिसून येत आहेत. गोला कारखान्याच्या परिसरातील शेतकऱ्यांनी सर्वाधिक ऊस लागवड घटवली आहे. कारण बजाज ग्रुपचे तीन कारखाने गोला, पलिया आणि खंभारखेडा हे ऊस बिले देण्यात सर्वात पिछाडीवर आहेत. त्याचा परिणाम म्हणून या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपले क्षेत्र घटवले आहे.
दरम्यान, सॅम्पल सर्व्हेत ३.३१ टक्के ऊस क्षेत्र कमी झाल्याचे दिसून आले आहे. ३० जूनपर्यंत हा सर्व्हे सुरू राहील. सध्या ७३ टक्के क्षेत्राचा सर्व्हे झाला आहे असे जिल्हा ऊस अधिकारी ब्रजेश कुमार पटेल यांनी सांगितले.
जिल्ह्यात १४१ सुपरवायझर्सनी सॅम्पल सर्व्हे केला आहे. त्यांनी १५ गावांतील स्थिती पाहिली आहे. पलिया, ऐरा या भागात ऊसाचा खोडवा घटला आहे. तर गोला, पलिया, खंभारखेड़ा, ऐरा, जेबीगंज, गुलरिया, कुंभी या भागात लागण घटली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link