सांगली : जिल्ह्यातील जत तालुक्यातील राजे विजयसिंह डफळे सहकारी साखर कारखाना दुष्काळा मुळे बंद होता, 2012 मध्ये साखराळे येथील राजारामबापू कारखान्याने चालवायला घेतल्यापासून चार वर्षांनंतर डफळे कारखान्याचा गाळप हंगाम घेंतला जाणार आहे. या हंगामात कारखान्याचे साडे तीन लाख टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट आहे.
डफळे साखर कारखान्याने राज्य सहकारी बँकेचे 56 कोटीचे कर्ज न भागवल्याने बँकेच्या प्रशासक मंडळाने कारखान्याचा लिलाव केला. त्यावेळी 2012 मध्ये राजारामबापू कारखान्याने हा कारखाना 48 कोटी रुपयांना घेतला. 2016 पर्यत कारखाना चांगला चालवला. पण त्यानंतर दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे चार वर्षे हंगाम घेता आला नाही.
पण आता डफळे कारखान्याने साडेतीन लाख टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले असून, कवठेमहांकाळ, जत, सोलापूर जिल्ह्यतील मंगळवेढा, सांगोला तालुक्यात साडे तीन लाख टन ऊसाची नोंदणीही केली आहे. जत कवठेमहांकाळ तालुक्यात प्रत्येकी दीड लाख तर सांगोला आणि मंगळवेढ्यात 50 हजार असे साडेतीन लाख टन ऊसाचे नियोजन आहे.
याबाबत बोलताना राजारामबापू कारखान्याचे कार्यकारी संचालक आर.डी. माहुली म्हणाले, हा कारखाना दुष्काळी तालुक्यांसाठी वरदान तर ठरेलच. शिवाय शेतकरी, सभासदांना चांगला ऊस दरही देण्यात येईल.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.