सहारनपूर : कोरोनाच्या कहरामध्ये शेतकर्यांसाठी चांगली बातमी, कोरोना दरम्यान गुरुवारी 111 करोड रुपयांची ऊस थकबाकी भागवण्यात आली आहे. डीसीओ केएम मणि त्रिपाठी यांनी स्वत: कोविड पॉजिटिव्ह असतानाही ग्लोव्हज घालून सही केली. यामुळे जिल्ह्यामद्ये ऊस थकबाकीचा आलेख आता 500 करोड च्या खाली आला आहे.
जिल्हा ऊस अधिक़ारी केएम मणि त्रिपाठी यांनी सांगितले की, नानौता व सरसावा कोऑपरेटिव कारखान्याचे 92 करोड रुपये शासनाकडून मिळाले आहेत, तर 13 करोड रुपयांची बाकी देवबंद त्रिवेणी कारखान्याने भागवली आहे. नानौता कोऑपरेटीव कारखान्याचे 64 करोड तर सरसावा कोऑपरेटिवची 28 करोड रुपयांची बाकी देण्यात आली आहे. 95 लाख रुपये बजाज गांगनौली तर 5.5 करोड उत्तम शेरमाउ कारखान्याने भागवले आहेत.
जिल्हा ऊस अधिकारी यांच्यानुसार, जिल्ह्यामध्ये 70 टक्क्यापेंक्षा अधिक थकबाकी भागवण्यात आली आहे आणि आता केवळ 496 करोड रुपये बाकी राहिले आहेत. कोऑपरेटिव कारखान्यांनी 80 टक्क्यांपेक्षा अधिक पैसे दिले आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.