कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले पोर्ले येथील दत्त दालमिया साखर कारखान्याने यंदाच्या, सन २०२४-२५ मधील गळीत हंगामासाठी चालू हंगामात अकरा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. या वर्षी एक सारखा पडलेल्या पावस, महापूर व बदलत्या वातावरणाचा ऊस उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. तरीही शेतकऱ्यांचा विचार करून कारखान्याच्यावतीने उसाला प्रती टन ३३०० रु. एकरकमी पहिला हप्ता देण्यात येईल, अशी माहिती कारखान्याचे युनिट हेड एस. रंगाप्रसाद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हंगाम संपल्यानंतर जो साखर उतारा राहील त्या आधारे दर आदा करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
युनिट हेड रंगाप्रसाद यांनी सांगितले की, यंदा विविध कारणांनी उसाचे उत्पादन घटणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेला सर्व ऊस दालमिया कारखान्यास पाठवावा. शासनाच्या धोरणानुसार एफआरपी हंगाम संपल्यानंतर सरासरी साखर उताऱ्यावर आधारित राहणार आहे. त्यामुळे दालमिया कारखान्याच्यावतीने गाळप हंगाम २०२४- २६ साठी पहिली उचल प्रतिटन ३३००रु जाहीर केली आहे. यावेळी मुख्य शेती अधिकारी संग्राम पाटील, एचआर प्रमुख सुहास गुडाळे, असिस्टंट शेती अधिकारी शिवप्रसाद देसाई, शिवप्रसाद पडवळ, चिंतामणी पाटील, मनीष अग्रवाल, नीलेश पाटील, कणकसबाई, मणिकंदन, कर्मचारी प्रतिनिधी विलास शिंदे, एम. एम. पाटील आदी उपस्थित होते.