नवी दिल्ली : द्वारिकेश शुगरने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कमजोर कमाईची आकडेवारी सादर केली आहे. कमी साखर विक्रीमुळे महसुलात ३६ टक्क्यांची घट झाली आहे. मार्जीनही आधीच्या ९ टक्क्यांवरुन घसरुन ७ टक्क्यांवर आले आहे. द्वारिकेश शुगर इंडस्ट्रिजचे व्यवस्थापकीय संचालक विजय बांका यांनी अलिकडेच CNBC-TV18 शी बोलताना सांगितले की, या आर्थिक वर्षात आम्ही एकाचवेळी ७ कोटी लिटर इथेनॉलची विक्री करू. ते म्हणाले की, इथेनॉल व्यवसाय हा मुख्य आधार बनत आहे. त्यामुळे आमचे साखर उत्पादन आणि इन्व्हेंट्री नियंत्रित करण्यास मदत मिळेल. आणि हे आमच्या व्यापाराच्या मॉडेलमध्ये आदर्श बदल होऊ घातला आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत कंपनीला १.६ कोटी लिटर इथेनॉल विक्रीची अपेक्षा आहे. बांका यांनी सांगितले की, ते पुढील आर्थिक वर्षामध्ये १० कोटी लिटरहून अधिक इथेनॉल विक्रीच्या आपल्या क्षमतेबाबत आशावादी आहेत. ते म्हणाले की, जसजसा हंगाम पुढे सरकेल, तसतसे इथेनॉल व्यवसायातील मार्जिन वाढणार आहे. चौथ्या तिमाहीत द्वारिकेश शुगर इंडस्ट्रिजसह सर्व साखर कंपन्यांसाठी हंगामातील चांगल्या कामगिरीची संधी आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने १.६ कोटी लिटर इथेनॉल विक्री केली आहे. ते म्हणाले की, चौथ्या तिमाही सर्वसाधारणपणे सर्व साखर कंपन्यांसाठी चांगली तिमाही असते. कारण, या तिमाहीत आपले उत्पादन आणि रिकव्हरी चांगली झाली आहे. गेल्या आठवड्यात द्वारिकेश शुगरच्या शेअरमध्ये ७.२२ टक्के आणि गेल्या महिनाभरात १२.९० टक्क्यांची घसरण झाली आहे.