नवी दिल्ली : द्वारिकेश शुगर आता साखरेच्या तुलनेत इथेनॉल उत्पादनाला प्राधान्य देण्याची तयारी करत आहे, असे प्रतिपादन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विजय बांका यांनी सीएनबीसी-टीव्ही १८ शी बोलताना सांगितले. ते म्हणाले की, पुढील काळात आम्ही साखर उत्पादन टाळण्याचे आमचे प्रयत्न सुरू ठेवणार आहोत. आणि आम्ही अधिकाधीक इथेनॉल उत्पादन करण्याचा प्रयत्न करू. पूर्ण हंगामात आम्ही इथेनॉलच्या आघाडीवर १.३९ लाख टन साखर उत्पादन टाळले आहे. पुढील काळात अशी स्थिती रायम राहिल असे आम्हाला वाटते.
त्यांनी इथेनॉल उत्पादनात कंपनीच्या संपूर्ण एकीकरणावर प्रकाशझोत टाकला. ते म्हणाले, इथेनॉल उत्पादन आणि विक्री करण्याची आमची वार्षिक क्षमता ११ कोटी लिटर आहे. आणि आता आम्ही पूर्णपणे एकिकृत आहोत. आम्हाला बाहेरील मोलॅसिसवर अवलंबून राहावे लागत नाही. या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न ५७१.५४ कोटी रुपये होते. गेल्या वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत ते २.२ टक्के अधिक आहे.
बांका म्हणाले की, पूर्ण वार्षिक आधारावर इथेनॉल उत्पादनासाठी विविध स्रोत लक्षात घेवून कंपनीकडे २० टक्के सस्टेनेबल मार्जिन आहे. त्यामुळे थेट उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादनासह बी हेवी मोलॅसीसपासूनही इथेनॉल मिश्रण तयार होईल. तर उसाच्या रसापासून इथेनॉलमध्ये मार्जिन कमी आहे. मात्र, ही हेवी मोलॅसीसपासून उत्पादित इथेनॉलपेक्षा ते खूप अधिक आहे.
इथेनॉलच्या किमतीबाबत ते म्हणाले की, उद्योगाला या किमती लवकरच चांगल्या होतील अशी अपेक्षा आहे. इथेनॉलच्या किमती लवकरच वधारतील. तर आम्ही गेल्या काही काळात साखरेच्या किमती खूप कमी असल्याचे पाहिले आहे.