‘व्हीएसआय’चा द्वारकाधीश कारखान्याला उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार

पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे राज्यातील खासगी क्षेत्रात उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या साखर कारखान्यांमध्ये येथील द्वारकाधीश साखर कारखान्याचा उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ‘व्हीएसआय’चे अध्यक्ष खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील, विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्या हस्ते कारखान्याचा गौरव करण्यात आला. कारखान्याच्या शिरपेचात या पुरस्कामुळे मानाचा तुरा खोवला गेला, असे द्वारकाधीश कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत यांनी सांगितले.

अध्यक्ष शंकरराव सावंत यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याची प्रगतिपथाकडे वाटचाल सुरू आहे. मागील वर्षी कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन ऊस विकास हे पुरस्कार मिळालेले आहेत. विस्माकडूनही उत्कृष्ट विकासाचा पुरस्कार मिळाला आहे. दरम्यान, या पुरस्कारामुळे अध्यक्ष सावंत, संचालक कैलास सावंत, कार्यकारी संचालक सचिन सावंत यांनी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. सर्व ऊस उत्पादक व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here