ई-बाय शुगरचे फाउंडर आणि सी.ई.ओ. उप्पल शाह, एमडी हेमंत शाह यांचा ‘बिजनेस टायटन्स ऑफ इंडिया’ पुरस्काराने सन्मान

मुंबई : देशातील अग्रगण्य साखर खरेदी -विक्री, निविदांसाठीचा ऑनलाइन प्लॅटफॉर्म ई-बाय शुगरचे (eBuySugar.com) सीईओ श्री. उप्पल शाह आणि एमडी श्री. हेमंत शाह यांचा जागरण ग्रुप – रेडीओ सिटीतर्फे यंदाच्या ‘बिजनेस टायटन्स ऑफ इंडिया’ या आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने गौरव करण्यात आला. देशातील सर्वात मोठा ऑनलाईन  साखर खरेदी विक्री प्लॅटफॉर्म म्हणून ई-बाय शुगर डॉट कॉमची (eBuySugar.com) निवड करण्यात आली होती. हा शानदार पुरस्कार वितरण सोहळा दुबई येथे १० जून २०२३ रोजी पार पडला.

जागरण ग्रुप – रेडीओ सिटीतर्फे देशातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नामवंत यशस्वी उद्योजकांची ‘बिजनेस टायटन्स ऑफ इंडिया’ पुरस्कारासाठी निवड केली जाते. त्यामध्ये यंदा कोल्हापूरच्या शाह बंधूंची निवड करण्यात आली होती. अभिनेते सुनील शेट्टी, अभिनेत्री करिश्मा तन्ना, निम्रत कौर, कैनात अरोरा या बॉलिवूड स्टार्स सोबतच  दुबईच्या राजघराण्यातील मान्यवर, उद्योग क्षेत्रातील तज्ञ यांच्या उपस्थितीत हा शानदार पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

कोल्हापुरातील ख्यातनाम जे.के.ग्रुपची उपकंपनी असलेल्या ई-बाय शुगर डॉट कॉमचे (eBuySugar.com) संस्थापक (फाउंडर) उप्पल शाह आणि हेमंत शाह यांनी ई-बाय शुगरच्या माध्यमातून देशाच्या साखर उद्योगात अल्पावधीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जितूभाई के. शाह यांनी 1981 मध्ये स्थापन केलेल्या जे.के.ग्रुपने साखर उद्योगा साठी ३६० डिग्री मध्ये प्रॉडक्ट्स लाँच केले आहेत, ज्या मध्ये eBuySugar.com, ChiniMandi News,  AgriMandi Advisory आणि आंतरराष्ट्रीय साखर आणि इथेनॉल कॉन्फरन्स चा समावेश आहे. जे.के.ग्रुपने साखर उद्योगा मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवला आहे.

2020 मध्ये श्री. उप्पल शाह आणि श्री. हेमंत शाह यांनी ebuysugar.com च्या माध्यमातून साखर खरेदी – विक्री, निविदांसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुरू केला. या प्लॅटफॉर्मशी अल्पावधीत देशातील तब्बल २५०० ट्रेडर्स आणि कारखानदार जोडले गेले आहेत. हे ग्राहक या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून साखर खरेदी- विक्री करतात. आता पर्यंत ebuysugar.com साखर खरेदी-विक्रीची ३००० कोटी रुपयापेक्षा अधिक उलाढाल करीत भारतातील सर्वात मोठे ऑनलाइन पोर्टल म्हणून नावारूपास आले आहे. उप्पल शाह आणि हेमंत शाह या दोन बंधूनी आपले वडील जितूभाई के. शाह यांच्या उद्यमशीलतेचा वारसा यशस्वीपणे सांभाळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here