देशाच्या साखर उद्योगात ई-बाय शुगरने स्वतंत्र ठसा उमटवला : हेमंत शहा

कोल्हापूर : जागतिक स्पर्धेत टिकायचे असेल तर देशातील साखर उद्योगाच्या विकासासाठी आधुनिकीकरण आणि डिजिटलायझेशन अपरिहार्य असल्याचे मत ‘ई-बाय शुगर’चे सहसंस्थापक आणि डेप्युटी सीईओ हेमंत शहा यांनी व्यक्त केले. जे.के.शुगर अ‍ॅण्ड कमोडीटीज् प्रा.लि.अंतर्गत कार्यरत ई-बाय शुगर कंपनीतर्फे आयोजित USI (Uplifting Sugar Industry) कॉन्फरन्समध्ये हेमंत शहा यांनी राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय साखर उद्योगासाठी डिजिटलायझेशनची आवश्यकता आणि त्यामध्ये ई-बाय शुगर पार पाडत असलेली भूमिका याबाबत सविस्तर विवेचन केले. यावेळी जेके समुहाचे संस्थापक जितूभाई शहा, ‘ई-बाय शुगर’चे संस्थापक आणि सीईओ उप्पल शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.

ई-बाय शुगरचे संस्थापक आणि एमडी हेमंत शहा म्हणाले कि, ई-बाय शुगर या अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफार्मच्या माध्यमातून ऑनलाईन साखर विक्री टेंडर प्रक्रिया राबवली जात आहे. ई-बाय शुगरच्या माध्यमातून साखर उद्योगात पारदर्शकता आणण्याबरोबरच साखर उद्योगाच्या भरभराटीसाठी प्रयत्न केला जात आहे. ई-बाय शुगरमुळे देशाच्या साखर उद्योगाला व्यवसायवृध्दी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

हेमंत शहा म्हणाले कि, साखर उद्योगातील चाळीस वर्षांपेक्षा जास्त अनुभव जेके समुहाकडे असून त्याचा फायदा देशातील साखर उद्योगाला होत आहे. साखर कारखानदार आणि व्यापारी यांच्यातील व्यवहारात पारदर्शकता आणण्याची महत्वाची भूमिका पार पाडण्याचे काम ई-बाय शुगर करत आहे. देशाच्या साखर उद्योगात ई-बाय शुगर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे शहा यांनी सांगितले. यावेळी हेमंत शहा यांनी ई-बाय शुगरची कार्यप्रणाली आणि साखर कारखानदार आणि व्यापाऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. त्यानंतर सलमान हैदर, हेमंत कुमार यांनी साखर उद्योगाच्या आधुनिकीकरणाची आवश्यकता, हवामानाचा साखर उद्योगावर होणारा परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली.

USI कॉन्फरन्सला भारती शुगरचे चेअरमन ऋषिकेश लाड, कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी, सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एन.वाय.पाटील, बिद्री कारखान्याचे कार्यकारी संचालक के.एस.चौगले, ‘दत्त इंडिया’चे जीएम शरद मोरे, सोनहिरा कारखान्याचे एमडी शरद कदम, श्रीपती शुगरचे कार्यकारी संचालक महेश जोशी, शरद सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक भूपाल आवटी, कुंभी कासारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक धीरज माने यांच्यासह महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील 50 पेक्षा जास्त साखर कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, कार्यकारी संचालक उपस्थित होते.

ई-बाय शुगरतर्फे 3000 कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल

2020 मध्ये श्री. उप्पल शहा आणि श्री. हेमंत शहा यांनी ebuysugar.com च्या माध्यमातून साखर खरेदी – विक्री, निविदांसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुरू केला. या प्लॅटफॉर्मशी अल्पावधीत देशातील तब्बल २५०० ट्रेडर्स आणि कारखानदार जोडले गेले आहेत. हे ग्राहक या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून साखर खरेदी- विक्री करतात. आता पर्यंत ebuysugar.com साखर खरेदी-विक्रीची 3000 कोटी रुपयापेक्षा अधिक उलाढाल करीत भारतातील सर्वात मोठे ऑनलाइन पोर्टल म्हणून नावारूपास आले आहे.

पारदर्शी व्यवहार आणि खरेदी-विक्रीची संपूर्ण जबाबदारी…

ई-बाय शुगर प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ऑनलाईन साखर खरेदी-विक्री प्रक्रिया पारदर्शीपणे राबविली जाते. इतकेच नव्हे तर ई-बाय शुगरच्या माध्यमातून ग्राहक आणि विक्रेता यांच्या हितासाठी खरेदी-विक्रीची संपूर्ण जबाबदारी पार पाडली जाते. त्यामुळेच ई-बाय शुगर प्लॅटफॉर्म अवघ्या काही वर्षात देशातील आघाडीचा प्लॅटफॉर्म म्हणून नावारूपास आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here