E२० ईंधनामुळे ऑटोमोबाईलच्या किमतीत किरकोळ वाढ शक्य : ICRA

चेन्नई : २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रीत  E२० ईंधनाकडे वळण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे ऑटो उद्योगात तेजीने किमती वाढणार नाहीत. ICRA च्या नव्या रिपोर्टनुसार, कार आणि SUVs मध्ये जवळपास १ टक्के वाढ होईल, आणि दुचाकी वाहनांमध्ये जवळपास २ ते ३ टक्के वाढ पाहायला मिळेल. तथापि, E२०च्या वापरामुळे वाहनांच्या इंधन कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो ज्यासाठी कंपन्यांना कमी वजन आणि इतर उपायांमध्ये गुंतवणूक करावी लागेल. इथेनॉल मिश्रणापासून वाहनांच्या उत्सर्जनात घट होईल, ऊर्जा सुरक्षा मजबूत होईल आणि तेल आयात कमी करण्यास मदत मिळेल. तसेच परदेशी चलनाच्या साठ्याचे संरक्षण होईल. याशिवाय, इतर लाभांमध्ये देशात अतिरिक्त साखर पुरवठ्याला नियंत्रणात ठेवण्याचा समावेश आहे.

ICRA चे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि ग्रुप हेड शमशेर दिवाण यांनी सांगितले की, वाहनांमध्ये कोणत्याही मोठ्या डिझाइन बदलाची गरज नाही आणि प्रवासी वाहनांच्या बाबतीत वाहन खर्चावर किमान १ टक्का परिणाम तर दुचाकी वाहनांबाबत कमीत कमी २ ते ३ टक्के परिणाम होण्याची अपेक्षा आहे. दिवाण म्हणाले की, सीएनजी, ईव्ही आणि हायब्रीड वाहनांच्या वापरामुळे पुढील पाच वर्षात नव्या वाहनांच्या विक्रीत २० ते ३० टक्के वाढ होईल. मात्र, पेट्रोल आधारित वाहनांच्या नव्या पीव्ही विक्रीत महत्तवपूर्ण भाग असेल अशी शक्यता आहे. गेल्या काही वर्षात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण हळूहळू वाढवण्यात आले आहे. आणि भारताने २०२२ मध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रणाचा टप्पा गाठण्यात आला आहे. याशिवाय, भारत सरकारने E२० टप्पा गाठण्याचे आपले उद्दिष्ट २०३० ऐवजी २०२५ वर आणले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here