कर्नाटकने लवकर ऊस गाळप सुरू केल्याने महाराष्ट्रातील साखर कारखान्यांवर याचा फारसा परिणाम होणार नाही.
टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर मिल्सचे अध्यक्ष पी. आर. पाटील म्हणाले की, कर्नाटकने ऊस गाळप हंगाम २५ ऑक्टोबरपर्यंत सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातील साखर कारखान्यांवर कोणताही परिणाम होणार नाही.
महाराष्ट्रात ऊसाचे गाळप एक नोव्हेंबरपासून सुरू होते. या वर्षी उसाचे उत्पादन कमी असल्याने गळीत हंगाम पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.
यापूर्वी, कर्नाटक सरकारने १ ते १५ नोव्हेंबर यादरम्यान, ऊस गाळपाला परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. आणि या निर्णयाचा महाराष्ट्रातील सीमा भागातील कारखान्यांना एक मोठा दिलासा मिळाला होता. कारण, शेतकरी आपले उत्पादन शेजारील राज्यांना पाठविण्यास प्राधान्य देतात.
सीमाभागातील शेतकरी कर्नाटकलाही ऊस पुरवठा करतात. आता, कर्नाटकात गळीत हंगाम लवकर सुरू होणार असल्याने, शेतकरी आपले उत्पादन कर्नाटकात पाठवू लागले तर ऊस पुरवठ्यात घट होण्याची भीती साखर कारखानदारांना आहे.
पाटील यांनी द टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, आम्ही राज्य सरकारला सर्व बाबी लक्षात घेऊन साखर कारखानदारांना एक नोव्हेंबरपासून गाळप सुरू करण्यास परवानगी देण्याचा सल्ला दिला. मुख्यत्वे सणासुदीच्या कालावधीमुळे कर्नाटकमध्ये कामगारांची टंचाई आहे. कर्नाटकात दसरा अधिक दिवस साजरा केला जातो. आणि यादरम्यान कामगार कोणतेही काम करीत नाहीत. जोपर्यंत कर्नाटकमध्ये तोडणी सुरू होईल, तोपर्यंत महाराष्ट्रातही तोडणी सुरू होऊ शकेल.