मुंबई / कोल्हापूर : देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया संकल्पनेपासून प्रेरित होऊन, 18 जून 2020 रोजी उप्पल शाह आणि हेमंत शहा यांनी eBuySugar.com द्वारे साखर खरेदी आणि विक्रीसाठी एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार केला. या प्लॅटफॉर्मशी 2800 हून अधिक युजर्स / वापरकर्ते जोडले गेलेले आहेत. या प्लॅटफॉर्मवरून देशात साखर खरेदी-विक्री केली जाते. आतापर्यंत 1 कोटी क्विंटलपेक्षा जास्त साखरेची खरेदी-विक्री या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून झाली आहे. ज्यातून तब्बल 3500 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल झाली आहे. आजपर्यंतचे सर्व खरेदी- विक्री व्यवहार अगदी बिनचूक पार पडले आहेत. eBuySugar.com प्लॅटफॉर्म साखर खरेदीदारांना मोफत विमा सुविधाही देते. तसेच साखर खरेदीदारांच्या दुकानापर्यंत साखर सुस्थितीत पोहचविण्याची तसेच व्यवहार आणि पेमेंटची हमी देते. यामुळेच eBuySugar.com अगदी अल्पावधीत भारतातील सर्वात मोठे पोर्टल बनले आहे.
eBuySugar.com चे संस्थापक आणि CEO उप्पल शाह म्हणाले की, देशात प्रथमच ऑनलाइन निविदा (eTender) लॉन्च कार्यक्रम देशातील आघाडीच्या आणि सर्वात मोठ्या ऑनलाइन प्लॅटफार्म eBuySugar.com द्वारे आयोजित केला जात आहे. ज्यामध्ये व्यापारी साखर कारखान्यातून थेट साखर खरेदी करतील आणि पेमेंटही थेट मिलच्या खात्यात जाईल. या ऑनलाइन टेंडरचा शुभारंभ कार्यक्रम 1 जुलै 2023 रोजी सकाळी 11.55 वाजता लोकनेते सदाशिवराव मंडलिक हमीदवाडा सहकारी साखर कारखान्यामधे आयोजित करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील (ता. कागल) हमिदवाडा येथे कारखाना कार्यस्थळावर हा कार्यक्रम होणार आहे. कारखान्याचे अध्यक्ष व खासदार श्री संजयजी मंडलिक यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी विविध मान्यवर, साखर कारखानदार व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
पहिले eTender दुपारी ठीक 12 वाजता eBuySugar.com वर सुरू होईल. व्यापारी/दलाल दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत साखर खरेदीसाठी निविदा भरू शकतील. निविदा रिपोर्ट 15 मिनिटांत म्हणजेच 1:15 वाजता अॅपवर ऑनलाइन उपलब्ध होईल. या विषयी अधिक माहितीसाठी 9881999101, 9326999101, 9371999101 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
श्री. उप्पल शाह म्हणाले की, ई-बाय शुगर (eBuySugar.com) हे देशातील साखरेच्या व्यापारासाठी आघाडीचे ऑनलाइन प्लॅटफॉर्म म्हणून उदयास आले आहे. याला ट्रेडिंग प्लॅटफॉर्म म्हणूनही ओळखले जाते. eBuySugar.com ही कोल्हापुरातील सुप्रसिद्ध JK समूहाची उपकंपनी आहे. उप्पल शाह आणि हेमंत शहा यांनी अल्पावधीतच eBuySugar द्वारे देशातील साखर उद्योगात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. श्री जितुभाई के. शाह यांनी 1981 मध्ये स्थापन केलेल्या जेके ग्रुप समूहाने ई-बाय शुगर – ऑनलाइन ट्रेड पोर्टल, चिनीमंडी – न्यूज अँड मीडिया हाऊस, अॅग्रीमंडी – सल्लागार कंपनी, शुगर अँड इथेनॉल अवॉर्ड्स (SEIA अवॉर्ड्स) आणि इंटरनॅशनल शुगर अँड इथेनॉल कॉन्फरन्स (SEIC कॉन्फरन्स) यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केली आहे.
eTender बद्दल माहिती देताना उप्पल शाह म्हणाले की, देशभरातील 2800 हून अधिक वापरकर्ते eBuySugar.com च्या माध्यमातून या ऑनलाइन टेंडरचा लाभ घेऊ शकतील. साखर उद्योगाशी संबंधित सर्वांनी या क्रांतिकारक घटनेचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. देशातील प्रत्येक साखर व्यापारी/दलाल, मग तो मोठा असो वा छोटा, या ऑनलाइन निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन थेट मिलमधून साखर डिजिटल पद्धतीने खरेदी करू शकतो. अशा प्रकारे, साखर विक्रीच्या ऑनलाइन प्रक्रियेमुळे साखर कारखानदारांना आणि आमच्या शेतकर्यांना जास्त भाव मिळेल. उप्पल शाह यांनी सर्व साखर कारखान्यांना eBuySugar.com प्लॅटफॉर्मवर त्यांची साखर विकून नफा वाढवण्याचे आवाहन केले आहे.