साखर कारखाना पुन्हा सुरू झाल्यास सितारगंजला आर्थिक फायदा

सितारगंज : सितारगंज साखर कारखाना पुन्हा सुरू झाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. तसेच राज्यातील लोकांना आर्थिक फायदा होईल असे प्रतिपादन उत्तराखंड अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष इक्लाब सिंह लाडी यांनी सांगितले. कुशल तसेच अशुलक बेरोजगारांना रोजगार मिळू शकेल. कारखाना परिसरात इतर प्लांट सुरू झाल्यास कारखान्याची स्थिती अधिक बळकट होईल असे लाडी यांनी सांगितले.

अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष लाडी यांनी सांगितले की, कारखाना बंद झाल्यानंतर शेतकरी भात, गव्हाच्या पिकाकडे वळले होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या कमी असल्याने ऊसाचे क्षेत्र ६५०० हेक्टरवरून २५०० हेक्टरवर आले. साखर कारखाना पुन्हा सुरू केल्यानंतर ऊस उत्पादकांना याचा फायदा होईल. उसाचे लागणही वाढेल. कारखान्यालगतच्या स्थानिक बाजारपेठेतील फळे, भाजीपाला उत्पादक, फास्ट फूड केंद्रांचाही आर्थिक फायदा होईल. प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष रुपात या क्षेत्रात नऊ हजार कुटुंबे आर्थिक मजबूत होतील असे घाडी यांनी सांगितले.

दरम्यान, ५ डिसेंबर २०१७ रोजी कॅबिनेटने सितारगंज येथील किसान सहकारी साखर कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सितारगंज, नानकमत्ता, खटीमा या भागातील शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. आयोगाचे उपाध्यक्ष सरदार इक्बाल सिंह यांनी मुख्यमंत्र्यांकडे याबाबत मागणी केली होती. भाजपचे आमदार आणि राज्यमंत्र्यांनी सातत्याने कारखाना सुरू करम्याची मागणी केली. अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष इक्बाल सिंह यांनी शेतकरी आयोगाचे उपाध्यक्ष राजपाल सिंह यांच्यासोबत १८ जानेवारी २०२० रोजी कारखान्याचे पाहणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना अहवाल देण्यात आला होता.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा“>WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here