कोल्हापूर : सध्या राज्यात ऊस गाळप हंगाम तेजीत सुरु आहे. असे असले तरी ऊस तोडणी मजुरांकडून प्रतिटन १००, ऊस अडचणीत असेल तर २०० रुपये अशा प्रकारे मागणी करून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.अशास्थितीत दाद मागायची कुणाकडे ? असा सवाल शेतकरी उपस्थित करू लागले आहेत. हा प्रकार कारखाना प्रशासनाला निदर्शनास येतो, पण प्रशासन गांभीर्याने घेताना दिसत नाही.
ऊस उत्पादनासाठी येणारा खर्च, मुलांच्या शाळेचा, सण समारंभ, लग्न कार्य, व धार्मिक कार्यक्रम याशिवाय घर खर्च शेतकऱ्यांना उसाच्या पैशातून करावा लागतो. जर ५० टनाचे १५० लाख रुपये शेतकऱ्यांना मिळतात. त्यातून इतर खर्च आणि ऊस तोडणी कामगारांना जादा दिलेले पैसे याचा विचार करता शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहत नाही. त्यासाठी पुढील वर्षाच्या पिकावर सोसायटीतून कर्ज घेऊन शेतकऱ्याला आपली गुजराण करावी लागत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक लुट रोखण्याची आवश्यकता आहे.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा