आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत आहे. आज, शनिवारी ब्रेंट क्रूड ऑईलच्या किमतीत वाढ नोंदविण्यात आली आहे. हे तेल ९८.५७ डॉलर प्रती बॅरलपर्यंत पोहोचले आहे. तर डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलमध्ये वाढ झाली असून ते ८५.०५ डॉलर प्रती बॅरलवर पोहोचले आहे. दरम्यान, आज सकाळी सहा वाजता देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, हिंदूस्थान पेट्रोलियमने पेट्रोल, डिझेलचा दर जाहीर केला आहे. तर काही राज्यांमध्ये पंजाब, छत्तीसगढमध्ये पेट्रोल, डिझेलच्या दरात बदल झाला आहे.
एबीपी लाईव्हमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पंजाबमध्ये पेट्रोल ०.४९ पैसे आणि डिझेल ०.४८ पैशांनी घटून ९६.४० आणि ८६.७६ रुपये प्रती लिटरवर पोहोचले आहे. तर छत्तीसगढमध्ये पेट्रोल ०.५० पैसे आणि डिझे ०.४९ पैसे प्रती लिटर महागले आहे. तेथील दर अनुक्रमे १०३.५८ आणि ९६.५५ प्रती लिटरवर पोहोचले आहे. दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रती लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल १०२.६३ रुपये तर डिझेल ९४.२४ रुपये प्रती लिटर आहे. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रती लिटर आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रती लिटर दर आहे.