बागपत : सूर्यदर्शन न झाल्याने कडाक्याच्या थंडीमुळे परिसर अक्षरशः गारठला आहे. किमान तापमान सात तर कमाल तापमान १६ डिग्री सेल्सियस एवढेच राहिले. माणसेच नव्हे तर जनावरेही गारठून गेल्याचे दिसून येत आहे. थंडीची तीव्रता इतकी आहे की बहुतांश लोकांनी आपापल्या घरात थांबणे पसंत केल्याने बाजार आणि रस्ते ओस पडल्याचे चित्र आहे. याचा परिणाम शेती कामांवरही झाला असून ऊस तोडणी मंदावली आहे.
या काळात शेकोटी पेटविण्यात येते. मात्र तीही कमी ठिकाणी दिसून आली आहे. बागपत नगरमध्ये केवळ चार ठिकाणी शेकोटी पेटल्याचे दिसले. ग्रामीण भागातही शेकोटी पेटल्या नसल्याने लोकांना थंडीपासून बचाव करण्यासाठी कोणताही उपाय दिसत नाही. २३ गो आश्रमशाळांमध्ये असलेल्या ३००० बेवारस गोवंशी जनावरे आणि रस्त्यावरुन फिरणाऱ्या गाईंची स्थिती अतिशय खराब आहे. थंडीचा परिणाम ऊस तोडणीवर झाला आहे. कामगार आणि शेतकरी तोडणी टाळत आहेत.
त्यामुळे कारखान्यांसमोर नो केन अशी स्थिती निर्माण होऊ शकते. दुपारी दोन वाजल्यानंतर काही प्रमाणात ऊन्हे परतल्याने लोकांना दिलासा मिळाला. थंडीमुळे बाजारात ग्राहक कमी आहेत. त्याचा परिणाम दुकानदारांवर झाल्याचे व्यापारी नेते नंद लाल डोग्रा यांनी सांगितले. तर काही दिवसांपासून पाऊस झाले. आता तीन दिवस सूर्यदर्शन झालेले नाही. त्यामुळे व्यापार मंदावल्याचे पंकज जैन आणि संजय रुहेला यांनी सांगितले.