सहकारी साखर कारखान्यांना बँकांकडून कर्ज देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी केंद्राचे प्रयत्न

नवी दिल्ली : सहकारी साखर कारखान्यांना अनेक अटींमुळे बँकांकडून कर्ज मिळण्यात अडचणी येत असून त्यांनी याबाबतची तक्रार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या तक्रारीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली.

बिझनेस स्टँडर्डमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या बैठकीला वित्त सचिव टीव्ही सोमनाथन आणि वित्तीय सेवा सचिव संजय मल्होत्रा आणि अन्न आणि कृषी मंत्रालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या हंगामात देशात विक्रमी ऊस आणि साखरेचे उत्पादन झाले आहे. महाराष्ट्रातही ऊसाचे उच्चांकी उत्पादन झाले असून, त्याचे गाळप करण्याची जबाबदारी आता साखर कारखान्यांची आहे. साखर कारखान्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये म्हणून महाराष्ट्र सरकारनेही अनुदान जाहीर केले आहे.

देशातील साखर उद्योगाशी लाखो कुटुंबे निगडीत असून, या उद्योगातील अडचणी दूर करण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशातील यंदाचा गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, काही साखर कारखान्यांनी पुढील गळीत हंगामासाठी ऊसाचे सर्वेक्षण सुरू केले आहे. यंदाच्या हंगामात ऊस आणि साखर उत्पादनात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशला मागे टाकले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here